मोबाइलकङून मैदाना कड़े अभिनव उपक्रम
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस, कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली
मिडगुलवाडी ग्रामपंचायत: सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष प्रकल्प मिडगुलवाडी ग्रामपंचायत हद्दीत विविध संवेदनशील भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे 24×7 देखरेख शक्य करतात. अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारून लाईव्ह मॉनिटरिंग, रेकॉर्डिंग आणि घटना व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. हे काम ग्रामपंचायतीच्या विकास योजनेतर्फे राबवले असून, गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. […]




